प्रवाशांचे मोबाईल लांबवणारा चोरटा जाळ्यात

भुसावळ : दोन प्रवाशांचे मोबाईल लांबवणार्‍या चोरट्याच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सय्यद अफताब सय्यद अरमान (रा.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दोन चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले.

दोन प्रवाशांचे मोबाईल लांबवले
भुसावळ बसस्थानकावर गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ऐनपूर येथील काशीनाथ हरी पाटील यांच्यासह वरणगाव येथील संदीप अकोले यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबवला होता. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात पाटील यांनी फिर्याद देताच बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या तासभरात संशयीताच्या मुसक्या आवळल्या. पाटील यांचा नऊ हजार 300 रुपयांचा तर अकोले यांचा 17 हजार 490 रुपयांचा मोबाईल आरोपी आफताबच्या ताब्यातून जप्त करण्यात आला. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नेव्हील बाटले, विनोद डोळे, प्रशांत पाटील, योगेश माळी, सचिन पोळ, उमाकांत पाटील यांनी ही कारवाई केली. हवालदार वियज नेरकर पुढील तपास करीत आहे.