भुसावळ- प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे-मंडुवाडीह साप्ताहिक विशेष गाडीचा समावेश आहे. गाडी क्रमांक 01455 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 07 जानेवारी ते 04 मार्च दरम्यान सहा फेर्या करेल तर ही गाडी दर सोमवारी पुण्याहून रात्री 8.20 वाजता सुटून तिसर्या दिवशी मध्यरात्री तीन वाजता मंदादिव्ह पोहोचेल. गाडी क्रमांक 01456 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 9 जानेवारी ते 6 मार्च दरम्यान सहा फेर्या करेल तर ही गाडी प्रत्येक बुधवार मंडुवाडीह येथून 6.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला पुणे, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, ज्ञानपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटी-गोरखपूर दरम्यान विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01115 साप्ताहिक विशेष गाड़ी दिनांक 12 ते 26 जानेवारी दरम्यान तीन फेर्या करेल तर ही गाडी दर शनिवारी 12.45 वाजता एलटीटीहून सुटून दुसर्या दिवशी सकाळी 11.35 वाजता गोरखपूर येथे पोहोचल. गाडी क्रमांक 01116 साप्ताहिक विशेष गाडी 13 ते 27 दरम्यान दरम्यान दर रविवारी गोरखपूर येथून दुपारी दोन वाजता सुटून तिसर्या दिवशी रात्री 12.35वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी , जबलपूर, कटनी, सतना, माणिपूर, अलाहाबाद छोकी, वाराणसी, महू, भटनी, देवरीया या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
एलटीटी-मंडुवाडीह दरम्यान विशेष गाड्या
एलटीटी-मंडुवाडीह दरम्यान गाडी क्रमांक 01087 साप्ताहिक गाडी 9 ते 30 जानेवारीपासून चालवली जाणार असून दर बुधवारी एलटीटीहून रात्री 12.45 वाजता सुटून दुसर्या दिवशी गुरुवारी पहाटे 4.45 वाजता मंडुवाडीह पोहोचेल. गाडी क्रमांक 01088 साप्ताहिक विशेष गाडी 10 ते 31 जानेवारी दरम्यान दर गुरूवारी मंडुवाडीहहून पहाटे 06.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 8.20 लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल. या गाडीला कल्याण, ईगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी सतना, माणिकपूर, अलाहाबाद, ज्ञानपूर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.