भुसावळ : तब्बल 22 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर देवळाली पॅसेंजरऐवजी भुसावळ-ईगतपुरी दरम्यान मेमू गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सोमवार, 10 जानेवारी मेमू सुरू होत असून गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. पॅसेजर गाडीच्या सात थांब्यावर ही गाडी थांबणार नाही.
मार्च 2020 पासून देवळाली पॅसेंजर बंदच
कोरोनाच्या काळात 22 मार्च 2020 रोजी देवळाली शटल बंद करण्यात आली. प्रवाशांच्या रेट्यानंतर व झालेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून गुरूवारी नोटिफीकेशन काढण्यात आले. भुसावळ-देवळाली पॅसेंजरऐवजी भुसावळ-ईगतपुरी मेमू गाडी चालवली जाणार आहे.
असे आहे वेळापत्रक
भुसावळ- ईगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटल्यानंतर ईगतपुरीला दुपारी तीन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ईगतपुरी येथून सकाळी 9.15 वाजता सुटून भुसावळ जंक्शनवर सायंकाळी 5.10 वाजता पोचेल. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. मेल, एक्सप्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. ही गाडी लहान स्थानकांवर केवळ एका मिनिटासाठी थांबणार आहे.