जळगाव: रिक्षातून एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे जात असतांना अभिजित राजू मराठे यांना रिक्षाचालकासह रिक्षात मागे बसलेल्या तीन जणांनी मारहाण करुन
त्यांच्याकडील मोबाईल तसेच 2400 रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घटना 30 रोजी रात्री इच्छादेवी चौफुली येथे घडली होती. घटनेनंतर मराठे यांना गणपती हाॅस्पिटलजवळ उतरवून तिघांनी पोबारा केला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात रामानंदनगर पोलिसांनी रिक्षाचालक वसीम शेरअली तेली वय 28 रा. गजानन पार्क, फातीमा नगर यास रविवारी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच 2400 रुपयांची रोकडपैकी 800 रुपये हस्तगत करण्यात आली आहे.
रिक्षा बसविले अन् काही अंतरावर मारहाण करुन लुटले
पिंपळकोठा येथील अभिजित मराठे हे 30 रोजी इच्छादेवी चौफुली येथे आले. त्यांना पिंपळकोठा येथे जाण्यासाठी रिक्षाचालकास विचारणा केली. रिक्षाचालकाने होकार दिल्यावर मराठे हे रिक्षात बसले. रिक्षात यापूर्वीच तीन जण बसले होते. महामार्गावरुन रिक्षाने जात असतांना गणपती हॉस्पिटलजवळ रिक्षाचालकासह तिघांनी मराठे यांना मारहाण करुन त्याच्या खिशातील 2400 रुपयांची रोकड तसेच मोबाईल घेवून पोबारा केला होता. याप्रकरणी अभिजित मराठे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
या पथकाने केली अटक
गुन्ह्यातील संशयिताबाबत पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार गोपाळ चौधरी, पोलीस नाईक रविंद्र पाटील, विजय खैरे, शिवाजी धुमाळ, रविंद्र चौधरी, उमेश पवार, हरिष डोईफोडे, संतोष गीते, सागर देवरे यांच्या पथकाने संशयित वसीम शेरअली तेली यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्यात वापरलेली एम.एच.19 व्ही.5841 क्रमांकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी दोन संशयित निष्प्पन्न झाले असून त्यांनाही पथकाकडून लवकरच अटक करर्णयात येणार आहे. पुढील तपास सहाय् यक फौजदार गोपाळ चौधरी हे करीत आहेत.