प्रवासादरम्यान दोन महिलांची पर्स लंपास

0

कल्याण । मुंबई विक्रोळी येथे राहणारी महिला (६०) गुरुवारी सकाळी डोंबिवलीत काही कामानिमित्त आली होती डोंबिवलीहून सागाव येथे जाण्यासाठी तिने रिक्षा पकडली. मात्र या प्रवासादरम्यान अज्ञात इसमाने हातचलाखीने त्यांच्या बॅगेतील सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र तसेच १५ हजार रुपये रोकड व लहान पर्स काढून पोबारा केला. सागाव येथे उतरल्यानंतर त्यांना पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

पोलीस तपास सुरु
दुसरी घटना रामनगर रिक्षा स्थानक ते नांदिवली टेकडी दरम्यान घडली आहे. उल्हासनगर येथे राहणारी महिला गुरुवारी सकाळी डोंबिवली रामनगर रिक्षा स्थानकपासून नांदिवली टेकडी दरम्यान रिक्षाने प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान तिच्या सोबत असलेल्या एका अनोळखी महिला सहप्रवाशाने तिच्या ४० हजार रुपये सोन्याचे दागिने असलेली पर्स काढून पळ काढला. काही वेळाने महिलेला पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी सदर महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.