प्रवासी झाले घामाघूम : चाळीसगावातील ओव्हर ब्रिज कामामुळे 11 रेल्वे गाड्या धावल्या उशिराने

Over bridge work in Chalisgaon: 11 trains ran late भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी ओव्हर ब्रिजवर गर्डर कामामुळे मंगळवारी 11 गाड्या उशिराने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मंगळवारी 11120 भुसावळ-ईगतपुरी मेमू रद्द करण्यात आली तर अप-डाऊन मार्गावरील 11 गाड्या विविध रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

प्रवासी झाले घामाघूम
11078 जम्मूतवी-पुणे एक्स्प्रेस वाघळी स्टेशनवर सकाळी 8. 15 ते 11.25 दरम्यान, 12142 पाटलीपूत्र-एलटीटी कजगाव स्टेशनवर सकाळी 8.30 ते 11.25 दरम्यान, 15065 गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस गाळण स्टेशनवर सकाळी 8.40 ते 11.25 दरम्यान थांबवून ठेवण्यात आली. 11056 गोरखपूर-एलटीटी पाचोरा स्टेशनवर 8.45 ते 11.25 दरम्यान, 12780 निजामुद्दीन-वास्को माहिजी स्टेशनवर 9.50 ते 11.25 दरम्यान तसेच 15018 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस शिरसोली स्थानकावर 10.25 ते 11.25 तसेच 15646 गुवाहाटी-एलटीटी एक्स्प्रेस जळगाव स्टेशनवर 10.54 ते 11.25 वाजेपर्यंत थांबवून ठेवण्यात आली.

डाऊन मार्गावरील गाड्यांही फटका
20103 एलटीटी-गोरखपूर हिरापूर स्टेशनवर सकाळी 10.35 ते 11.25 दरम्यान तसेच 22129 एलटीटी-प्रयागराज न्यायडोंगरी स्टेशनवर सकाळी 10.45 ते 11.25 दरम्यान व 12839 सीएसएमटी-हावडा पिंपरखेड स्टेशनवर 10.50 ते 11.25 दरम्यान तसेच 12779 वास्को निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही गाडी नांदगाव स्टेशनवर 11 ते 11.25 पर्यंत थांबवण्यात आली.