प्रवास न करणाऱ्यांकडूनही कमाई……..

0

नवी दिल्ली : रेल्वे नेहमी तोट्यात अशी रडारड सरकार करीत असते. तिकिटाचे दरही वाढतात परंतु प्रवाशांना सेवा देऊन कमाई करण्यापेक्षा तिकिटे रद्द करण्यातून रेल्वेने शेकडो कोटी रूपये कमावले आहेत. २०१६ -१७ या वर्षात रेल्वेने तिकीट रद्द करण्यातून १४०० कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे अशा या कमाईत गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्के वाढ झाली आहे.

रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना तिकीट रद्द करण्यातून होणाऱ्या कमाईची माहिती दिली. ही कमाई ऱिफंड नियम २०१५ नुसार होत असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती माहितीच्या अधिकारातही मागितली होती. आता राज्यसभेत माहिती मागितल्यावर रेल्वे माहिती प्रणाली केंद्रातून ती मिळाली आहे.