प्रविण माळी यांचा एकपात्री प्रयोग !

0
जळगाव– कै.डॉ.अण्णासाहेब बेंडाळे जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ.अण्णासाहेब जी़डी़ बेंडाळे महिला महाविद्यालयात मराठी विभागातर्फे चोपडा येथील प्रविण माळी यांचा एकपात्री प्रयोगाचा कार्यक्रम घेण्यात आला.यात माळी यांनी तुफान विनोदी ‘आयतं पायतं सख्यानं’ हे एकपात्री प्रयोग सादर सादर केला.
कै.डॉ.अण्णासाहेब बेंडाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर नाट्यकलावंत प्रविण माळी यांनी एकपात्री प्रयोगाला सुरूवात केली. अहिरणाी भाषेचा गोडवा, लोकसंस्कृती, लोकभाषा आणि लोकव्यवहार यांचा सुंदर मिलाप करीत विनोदी स्वरूपात प्रयोग सादर करत खान्देशातील लोकधारा त्यात लग्नातील गमती जमतींचे प्रसंग उभे करून, चंगळवादाचे प्रदर्शन करणारी तरूणाईचा देखील समाचार माळी यांनी या प्रयोगातून घेतला. तोच अहिरणी भाषेचे महत्व सांगत खान्देशातील अहिरणीचा कसा लहेजा बदलतो याचे सुध्दा उदाहणासह त्यांनी स्पष्ट केले़ सोबतच अहिराणी भाषेबरोबर लोकव्यवहाराचे समर्पक वर्ण करीत माळी यांनी खानदेशी लोकसंस्कृती विद्यार्थीनींनसमोर उभी केली. एकूण ४५ पात्र असलेला एकपात्री प्रयोग हा माळी यांनी उत्कृृष्टपणे सादर केला. दोन तास हसत-हसत या प्रयोगाला महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी मोठ्या संख्यने दार दिली. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे सचिव प्रा.एन.एस.पाटील, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, प्रा.सत्यजित साळवे, प्रा. दीपक पवार, वंदना नेमाडे, प्रा.राजू तडवी आदी उपस्थित होते.