जुन्नर । अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर येथील विज्ञान शिक्षक प्रवीण रामदास ताजणे यांना पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागाच्या वतीने तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कर नुकताच नारायणगाव येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात वितरीत करण्यात आला.
विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्त्यासाठी विद्यार्थीना मोफत मार्गदर्शन, व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन, आदिवासी भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी मोफत व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन आयोजनामध्ये सहभाग, मर्गदर्शनामुळे विद्यालयातील प्रकल्पाची जिल्हा व राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड, बाबेल ट्रस्टचा लेखन प्रेरणा व ज्ञान प्रेरणा पुरस्कार, शिवाजी मराठा शिक्षण संस्था शिवनेरचा 2012 साली आदर्श शिक्षक पुरस्कार, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघातर्फे दोन वेळा सन्मानित, तालुका विज्ञान प्रदर्शनात परिक्षक म्हणून काम केले आहे आदि शैक्षणिक कामांची दाखल घेऊन पंचायत समिती जुन्नरच्या वतीने प्रवीण ताजणे यांना तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अर्चना काशिद यांचाही गौरव
दुर्गम आदिवासी विभागातील निमगिरी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका अर्चना सिताराम काशिद यांना पंचायत समिती जुन्नर च्यावतीने देण्यात येणारा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरददादा सोनवणे, सभापती ललिताताई चव्हाण, गटनेत्या आशाताई बुचके, उपाध्यक्ष शरदराव लेंडे, जि. प. सदस्य देवरामशेठ लांडे यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी सतिश गाढवे गटशिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ यांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मान्यवरांकडून अभिनंदन
पुरस्काराबद्दल शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळसाहेब खिलारी, उपाध्यक्ष के. एस. डुंबरे, अविनाश पुंडे, सचिव डॉ. विलास चव्हाण, सुनिल ढोबळे सर्व संचालक, रतिलाल बाबेल, उपाध्यक्ष वाय. बी. दाते, सचिव टी. आर.वामन, सदस्य ज्ञानेश्वर केंद्रे, व्यंकट मुंढे, दिलीप लोंढेतसेच शाळेचे मुख्याध्यापक के.एस. ढोमसे, पर्यवेक्षक आर. डी. भागवत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी प्रवीण ताजणे यांचे अभिनंदन केले.