नवी दिल्ली । विश्व हिंदू परिषदेने नुकतीच नवी कार्यकारिणी घोषित केली आहे. यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना मोठा धक्का बसला आहे. तोगडियांचे निकटवर्तीय राघव रेड्डी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या पदावर हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू सदाशिव कोकजे निवडून आले आहेत. कोकजे हे मध्य प्रदेश हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आहेत. तोगडिया आणि राघव रेड्डी यांना नव्या कार्यकारिणीत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे विहिंपमध्ये तोगडिया युगाचा अखेर झाल्याचे बोलले जात आहे.