अविष्कार या संस्थेच्या ‘पोस्टर’ या हिंदी नाटकात मायमिंग व मॉप प्ले असल्यामुळे जवळजवळ 20/25 कलावंत काम करीत असत जयदेव सरांच्या लेखात त्या नाटकातला फोटो आणि सरांच उत्तम अफलातून दिग्दर्शन याचा उल्लेख केला होता. या मॉपमध्ये काम करणारी बरेच कलावंत नंतर व्यवसायिक नाटक/चित्रपटात काम भूमिका करायला लागले. या ग्रुपमध्ये माझी ओळख झाली एका शांत अबोल मितभाषी मित्राची. त्याच नाव प्रवीण शांताराम चव्हाण. नाटकात काम करण्याची आवड नाटाकाचा अभ्यास करण्याची आवड. काही अनुभवी लेखक/ दिग्दर्शक चर्चा करताना गप्पा मारताना त्यांच्या सोबत तासनतास उभ राहण्याची त्याच्या गप्पा ऐकण्याची आवड असलेला हा मित्र लालबागच्या चाळीत राहत होता. आम्ही भेटल्यावर चाळीतल्या गप्पा संस्कृतीबद्दल बोलायला त्याला फार आवडत असे.
वाचनाचीही खूप आवड असल्यामुळे तासनतास मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात वाचन करीत असताना आपण एखादे नाटक लिहावे असे त्याला वाटले, मनात आल आणि त्याने लिहायला सुरूवातही केली. डोक्यात जस येईल तस कागदावर तो उतरवित गेला. त्याच्या नाटकाची गोष्ट साधीच होती. स्वातंत्र्य काळात लढा देणार्या तरुणासोबत नाना नावाच्या एका तरुणाला सगळ्यासोबत ब्रिटीश सरकार जेलमध्ये टाकतात व नाना स्वातंत्रसैनिक होतात. प्रवीण हे कस सूचल तेव्हा मला म्हणाला माझ्या भावोजीचा पेपर स्टॉल ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारी होता. मी तेथे पेपर वाचायला जात असे तेव्हा त्याठिकाणी क्रांतीवीरांच्या गर्दीत नाना नावाच पात्र त्याला सुचल आणि त्यातून पहिल नाटक लिहील गेल ‘नाना टर टर फाटले’ या नाटकाला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व सर्व पारितोषिक मिळाली. प्रविणला एक लेखक म्हणून ओळख याच नाटकानी दिली. 1992 साली प्रविणने ‘आमच्या या घरात’ हे नाटक लिहील आणि व्यावसायिक रंगभूमीवरील वेगळ्या अशा या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीला सयाची शिंदे/ गिरीष ओक हे अभिनेते व प्रवीण शांताराम नावाचा लेखक दिला. या नाटकाला नाट्यदर्पणतर्फे उत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक मिळाले. यानंतर मात्र प्रवीण शांताराम या लेखकाने मागे वळून पाहीले नाही. याच नाटकावर आधारीत महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हेच नाटक गुजराती रंगभूमीवर ‘भाई’ या नावाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘येवा कोकण आपलाच असा’ या मालवणी नाटकात भूमिका करणारे मच्छिंद्र कांबळी यांना खूपच आवडलेली भूमिका.
मराठी नाटक ‘अभिमन्यू’, तारा सखाराम, श्रीमान श्रीमती, तू तसा मी, मराठी चित्रपट भाऊ माझा पाठीराखा, मी या गोल गोल डब्यात .सध्या रंगभूमीवर संपदा जोेगळेकर दिग्दर्शित ‘टॉस’ कट टू कट ही नाटके चालू आहेत. अविष्कार या संस्थेच्या ‘पोस्टर’ या हिंदी नाटकात मायमिंग व मॉप प्ले असल्यामुळे जवळजवळ 20/25 कलावंत काम करीत असत जयदेव सरांच्या लेखात त्या नाटकातला फोटो आणि सरांच उत्तम अफलातून दिग्दर्शन याचा उल्लेख केला होता. या मॉपमध्ये काम करणारी बरेच कलावंत नंतर व्यवसायिक नाटक/चित्रपटात काम भूमिका करायला लागले. या ग्रुपमध्ये माझी ओळख झाली एका शांत अबोल मितभाषी मित्राची. त्याच नाव प्रवीण शांताराम चव्हाण. नाटकात काम करण्याची आवड नाटाकाचा अभ्यास करण्याची आवड. काही अनुभवी लेखक/ दिग्दर्शक चर्चा करताना गप्पा मारताना त्यांच्या सोबत तासनतास उभ राहण्याची त्याच्या गप्पा ऐकण्याची आवड असलेला हा मित्र लालबागच्या चाळीत राहत होता. आम्ही भेटल्यावर चाळीतल्या गप्पा संस्कृतीबद्दल बोलायला त्याला फार आवडत असे. वाचनाचीही खूप आवड असल्यामुळे तासनतास मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात वाचन करीत असताना आपण एखादे नाटक लिहावे असे त्याला वाटले, मनात आल आणि त्याने लिहायला सुरूवातही केली. डोक्यात जस येईल तस कागदावर तो उतरवित गेला. त्याच्या नाटकाची गोष्ट साधीच होती. स्वातंत्र्य काळात लढा देणार्या तरुणासोबत नाना नावाच्या एका तरुणाला सगळ्यासोबत ब्रिटीश सरकार जेलमध्ये टाकतात व नाना स्वातंत्रसैनिक होतात. प्रवीण हे कस सूचल तेव्हा मला म्हणाला माझ्या भावोजीचा पेपर स्टॉल ऑगस्ट क्रांती मैदानाशेजारी होता. मी तेथे पेपर वाचायला जात असे तेव्हा त्याठिकाणी क्रांतीवीरांच्या गर्दीत नाना नावाच पात्र त्याला सुचल आणि त्यातून पहिल नाटक लिहील गेल ‘नाना टर टर फाटले’ या नाटकाला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व सर्व पारितोषिक मिळाली. प्रविणला एक लेखक म्हणून ओळख याच नाटकानी दिली. 1992 साली प्रविणने ‘आमच्या या घरात’ हे नाटक लिहील आणि व्यावसायिक रंगभूमीवरील वेगळ्या अशा या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीला सयाची शिंदे/ गिरीष ओक हे अभिनेते व प्रवीण शांताराम नावाचा लेखक दिला. या नाटकाला नाट्यदर्पणतर्फे उत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक मिळाले. यानंतर मात्र प्रवीण शांताराम या लेखकाने मागे वळून पाहीले नाही. याच नाटकावर आधारीत महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. हेच नाटक गुजराती रंगभूमीवर ‘भाई’ या नावाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. ‘येवा कोकण आपलाच असा’ या मालवणी नाटकात भूमिका करणारे मच्छिंद्र कांबळी यांना खूपच आवडलेली भूमिका.
मराठी नाटक ‘अभिमन्यू’, तारा सखाराम, श्रीमान श्रीमती, तू तसा मी, मराठी चित्रपट भाऊ माझा पाठीराखा, मी या गोल गोल डब्यात .सध्या रंगभूमीवर संपदा जोेगळेकर दिग्दर्शित ‘टॉस’ कट टू कट ही नाटके चालू आहेत. प्रवीण शांताराम यांचे लेखक म्हणून खूपच मोठे नाव झाले पण आजपर्यंत त्यांनी मध्यमवर्गीय लालबागच्या चाळीतू नंतर संसारी जीवन अगदी साध्या पद्धतीने जगताना मी पाहिले आहे. या सर्व प्रवासात कधी दुःख आर्थिक अडचणी आल्या तरी न डगमगता लालबाग ते ठाणे, ठाणे ते डोंबिवली असा प्रवास चालूच आहे. या प्रवासात त्याच्या जवळचे मित्र महेश दळवी, सुदेश बारशिंगे यांचे उपकार आहेत असे तो मानतो. डोंबिवलीत राहत असताना दिलीप गुजर कमलाकर बागवे यांचे सहाकार्य आणि प्रवासातील सोबती म्हणजे प्रवीणची पत्नी, भाऊ-बहीण लाडका भाचा उन्मेश चंद्र नाईक यांचा आवर्जून उल्लेख प्रवीण करतोच तर अशा या लेखक मित्राला खूप खूप शुभेच्छा.
– गुरुदत्त लाड