मुंबई । मुंबई शहर फुटबॉल संघटना आयोजित थर्ड लीग स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे संघ, संस्था आणि आस्थापनांनी लवकरात लवकर प्रवेश शुल्क भरावे असे आवाहन संघटनेने केले आहे. संस्थेचा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क 31 जुलै रोजी 5 वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहे. ही प्रकिया पूर्ण न करणार्या संघाना स्पर्धेत खेळू दिले जाणार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
परळच्या सेंट झेव्हियर्स मैदानात असलेल्या संघटनेच्या कार्यालयात हे अर्ज आणि शुक्ल घेण्यात येईल. याशिवाय संघटनेच्या फर्स्ट, सेकंड, सुपर, एलिट क्लब आणि ऑल सेकंड डिव्हिजन स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया संघटनेने सुरू केलीे. सेकंड डिव्हिजन, एलिट क्लब स्पर्धांच्या प्रवेशिका स्पर्धा शुल्कासह 10 ऑगस्टपर्यंत घेण्यात येतील, तर फर्स्ट डिव्हीजन आणि सुपर डिव्हीजन लढतींचे प्रवेश अर्ज स्कीरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट आहे.