यजुर्वेद महाजन म्हणतात की, मुलं शिक्षण घेतात मात्र ती फक्त पास होण्यासाठी पास झालं की शिक्षण घेतलं असं होत नाही. त्यामुळे 12 वी पास झालो याचा अर्थ फक्त मार्क मिळवले असा होतो. परंतु 12 वी पर्यंत शिक्षण घेतले याचा अर्थ आजपर्यंतचे शिक्षण समजून घेतले असा होतो. खरेतर एखाद्या विद्यार्थ्याला काय व्हायचे आहे हे त्या विद्यार्थ्याला पालक लहानपणीच त्याच्यावर लादलं जात; त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थी मानसिक दडपणाखाली वावरत असतात. पालकांनी मुलांना ठरवू द्यावे की, आपल्याला काय व्हायचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःशी बोलावे, स्वतःला काय येते हे ओळखावे, स्वतःची अभ्यासाची गती ओळखावी,मला काय येतं ,मी कोण आहे हे जर विद्यार्थी स्वतःशी बोलत राहिला तर त्याला योग्य निर्णय घेता येतो. आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो.
मात्र कोणताही मुलगा आयुष्यात कोणाचीही कॉपी होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतःशी बोलला तरच त्याला स्वतःचे गुण दिसून येतील असे महाजन सर सांगतात. मराठी मुलांमधील स्पर्धा परीक्षांविषयीची भीती नष्ट केली जातेस्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा शक्य तेवढा करु यावर नाहीतर आवश्यक आहे तितकाच करावा लागतो यावर अवलंबून आहे. दिवसातील कमीत कमी 3 ते 4 तास अभ्यासासाठी देणे महत्वाचे आहे.जर अधिकारी व्हायचं असेल तर जे गरजेचे आहे ते करावेच लागते त्यासाठी पर्याय ठेवता येत नाही असे महाजन सर सांगतात. आपल्या महाराष्ट्रातील मुलांमध्ये गणित व इंग्रजी विषयाची खूप भीती आहे. आपले शालेय जीवन सुरू होतानाच आपल्या मनावर पालक हे कठीण विषय आहेत हे बिंबवतात. महाजन सर म्हणतात आधी मुलांना अभ्यास करून किंवा शिकू द्यावे मग ठरवू द्या, आधीच मनात भीती घालणे चूक आहे. ज्या गोष्टीचा प्रयत्नच करत नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कठीण वाटत असतात. विद्यार्थ्यांनी आपले निर्णय स्वतः घेण्याचा प्रयत्न करावा पालकांनी त्याला प्रोत्साहन द्यावे आपले निर्णय लादू नयेत असे महाजन सर सांगतात. इतरांशी आयुष्यात कधीही तुलना करू नका, तुलना कारणारा माणूस कितीही पैसे असला तरी सुखी वा समाधानी होत नाही. अशी शिकवण ते विद्यार्थ्यांना देतात. महाजन सर सांगतात की आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा मी करेन ते चांगलेच असेल मग कोणी स्तुती करो अथवा ना करो, ते चांगलेच असेल असा विश्वास बाळगा; तसेच वाचन आपल्या आयुष्यात महत्वाचे योगदान देते. त्यामुळे वाचनाची आवड स्वतःत तयार करा. महाजन सरांनी दीपस्तंभ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधील 1056 माध्यामिक शाळांमधील 1 लाख 20 हजार 986 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यापर्यंत 2 लाख 4 हजार 223 पुस्तके पोहोचली आहेत. दिपस्तंभच्या माध्यमातून महाजन सर अनेक दिव्यांगांना प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक शिबिरात ते या दिव्यांग मुलांची चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवतात व यातून जे जे आजपर्यंत प्रशासकीत सेवेत आपल्या अनंत अडचणींवर मात देऊन रुजू झालेत त्यांची मुलाखत असते. महाजन सर स्वतः शिक्षक, व्याख्याते, कौन्सिलर, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण देत असले तरी विद्यार्थ्यांशी बोलताना ते कायम मित्र म्हणून वावरतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे दडपण कमी होऊन विद्यार्थी मनमोकळेपणाने सरांशी संवाद साधतात ही सरांची खासियत.आज दिपस्तंभतर्फे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. त्यात गुरुकुल, संजीवन आहेत. व यात देशातील प्रशासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी प्रकल्प सल्लागार पदी आहेत. सर सांगतात की शहरात आणि गावातील मुलांमध्ये खूप फरक आहे.शहरांमध्ये नोकर्या आहेत. नोकर्यांचे व करिअरचे पर्याय आहेत; मात्र खेड्यात असे प्रकार नाहीत, मुळात आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जिद्द आहे. त्यामुळे पर्याय नसल्याने स्पर्धा परीक्षेकडे खेड्यातील मुलांचा ओढा आहे.त्यामुळे या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणारी मुले ही खेड्यातील जास्त असतात. सर प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमी हेच सांगतात की जी भाषा कठीण वाटते ती ’ऐका व बोला’ भाषेचे हेच सूत्र आहे.आज महाजन सरांनी स्पर्धा परीक्षांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मनोबल वाढवण्यासाठी अनेक पुस्तके लिहून आणखीन पुस्तके लिहण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या दीपस्तंभचा पसरा वाढलेला आहे. 12 वर्षांत 500 हुन अधिक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहेत. तर 1400 हुन अधिक विद्यार्थी मनाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. आजपर्यंत महाजन सरांनी 1600 हुन अधिक व्याख्याने दिली आहेत. तर 6 लाख विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना मार्गदर्शन केले आहे. 60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले आहे. तर ग्रामीण भागात 10 खेड्यांमध्ये दीपस्तंभ ग्रामीण ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. तर अभ्यासमित्र, करिअमित्र, पालकमित्र व स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास या ही पुस्तके लिहिली आहेत. सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अगदी सरकारी पातळीवर त्यांची दखल घेतली जात आहे. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांना अजूनही वाटते की त्यांना दिव्यांग मुलांसाठी आणखी काही करायचे आहे. हे कार्य अजूनही अर्धवट आहे. महाजन सर आज एकच स्वप्न उराशी बाळगून आहेत ते म्हणजे देशात महाराष्ट्राचा स्पर्धा परिक्षांमधील टक्का कसा वाढेल. अल्पना दुबे ही अंध मुलगी विश्वास सार्थ ठरवेल व पहिल्या 20 मध्ये येईल असा विश्वास ते
व्यक्त करतात.
सिद्धेश प्रधान – 7400455566