जिल्ह्याच्या विकासाला गती देणार : जिल्हाधिकारी
2020 हे कोरोना काळातच गेलं. कोरोनामुळे जिल्ह्यातील सगळ्याच विकासकामांना खिळ बसली आहे. नव्या वर्षात या कामांना वेगाने सुरवात करण्यात येईल. कोरोना अजून गेला नाही. वर्ष बदलले म्हणून कोरोना गेला असे नाही. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासकीय कामकाजात अधिकाधिक सुधारणा करून नागरिकांना तत्पर सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वैयक्तीकदृष्ट्या वाचनाची आवड आहे. मात्र कोरोनातील कामकाजामुळे वाचनाला वेळ मिळत नव्हता. नव्या वर्षात महिन्यातून किमान एक पुस्तक वाचुन पुर्ण करणार असल्याचा संकल्प जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला आहे.
शासकीय रूग्णालयाबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कटिबद्ध : डॉ. रामानंद
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उत्तम कामांना सुरुवात झाली आहे व हि काम अशीच सुरु ठेवणे आणि जळगावकरांच्या मनात शासकीय वैद्यकीय रूग्णालयाबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मी आणि माझे सहकारी नेहेमीच कटिबद्ध राहू हा आमचा नववर्षाचा संकल्प असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे अधीष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.