प्रशासक नियुक्तीस स्थगिती

0

शहादा । कृषी उत्पन्न बाजार समितीवर जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या प्रशासक नियुक्तीस सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली असून या निर्णयामुळे शहादा बाजार समितीचे संचालक मंडळ पुर्ववत कायम झाले आहे. याबाबत अधिक वृत्त असे, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत दि. 24 एप्रिल रोजी संपुष्टात आल्याने जिल्हा उननिबंधकांनी एका आदेशान्वये सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची प्रशासकपदी नियुक्ती केली होती या नियुक्तीबाबत बाजार समितीचे संचालक दिपक पाटील यांनी प्राधिकरणाकडे अपील दाखल केले होते.

प्राधिकरणाकडे अपील
या अपीलाबाबत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी दि. 5 मे रोजी अपीलावर सुनावणी घेत दि. 9 रोजी आदेश दिला त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशास व त्याच्या अंमलबजावणीस अपीलावर अंतिम निर्णय होईपावेतो स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान गुरूवार दि. 10 रोजी प्रशासक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था निरज चौधरी यांनी बाजार समिती संचालक मंडळाकडे पदभार सुपूर्त केला आहे.

सभापतींकडून निर्णयाचे स्वागत
या निर्णयाचे बाजार समिती सभापती सुनिल पाटील यांच्यासह संचालक मंडळाने स्वागत केले आहे. प्रशासक नियुक्तीच्या आदेशास स्थगिती मिळाल्यानंतर प्रतिक्रीया व्यक्त करतांना बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील म्हणाले, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शेतकरी हिताचे निर्णय यापुढेही घेतले जातील. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशास स्थगीतीसाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन तसेच शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे सहकार्य मिळाले. अशी प्रतिक्रीया सभापती सुनिल पाटील यांनी दिली आहे.

घटनेची पार्श्‍वभूमी
एप्रिल महिन्यात 20 दिवस लिलाव प्र्रक्रीया बंद करण्यात आली होती. ती 24 एप्रिल रोजी सुरू झाली. मात्र, 25 एप्रिलपासून ती अनिश्‍चित ाळासाठी बंद राहणार आहे. बाजार समितीच्या विद्यमान संचलाक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण झाला. शासनाने नवीन संचालक मंडळ निवडीसाठी निवडणूक प्रक्रीया जाहीर केलेली नसल्याने मुदत पूर्ण झाल्यानंतर जिल्हा निबंधकांनी बाजार समितींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास सहाय्यक निबंधक निरव चौधरी यांनी मावळत सभापती सुनील पाटील यांच्याकडून बाजार समितीची सुत्रे हाती घेतली होती.