जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी 23 रोजी मतदान
जळगाव – जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 रोजी स. 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. मतदान केंद्र, मनुष्यबळ, बंदोबस्त याबाबतचा आढावा घेण्यात आला असुन निवडणुक ीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थांबली. तब्बल महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार आज थांबला असुन या प्रचारा दरम्यान महायुती आणि महाआघाडी यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण देखिल चांगलेच ढवळुन निघाले आहे. उद्या दि. 23 रोजी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली असुन प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 1960 मतदान केंद्र असून 53 सहाय्यकारी असे एकुण 2013 मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 19 लाख 25 हजार 352 इतके मतदार आहेत. यामध्ये 10 लाख 8 हजार 818 पुरुष तर 9 लाख 16 हजार 470 महिला तर 93 इतर मतदारांचा समावेश आहे.
रावेर लोकसभा मतदार संघासाठी 1872 मतदान केंद्र असून 34 सहाय्यकारी असे एकुण 1906 मतदान केंद्र असणार आहे. या मतदार संघात 17 लाख 73 हजार 107 इतके मतदार आहेत. यामध्ये 9 लाख 23 हजार 627 पुरुष तर 8 लाख 49 हजार 451 महिला तर 29 इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात 7 हजार 393 पुरुष तर 59 महिला असे एकूण 7452 सैनिक मतदार
जिल्ह्यासाठी 8 हजार 17 बॅलेट युनिट
लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्याकरीता 8 हजार 17 बॅलेट युनिट, 4 हजार 768 कंट्रोल युनिट तर 5 हजार 133 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध आहे. यावेळेला मतदाराने केलेले मतदान नेमके कुणाला झाले हे व्हिव्हीपॅट या मशिनच्या सहाय्याने 7 सेंकदासाठी दिसणार आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या मतदानाची खात्री होणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी हे नवे पाऊल ठरणार आहे.
निवडणुकीसाठी 32 हजार कर्मचार्यांची नियुक्ती
निवडणूकीसाठी जिल्ह्यात 30 हजार 370 अधिकारी, कर्मचारी आवश्यकता असून 32 हजार 529 इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे. जळगाव लोक सभा मतदार संघासाठी 172 व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 192 असे एकूण 364 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 36 मतदान केंद्र क्रिटीकल
जिल्ह्यात 36 मतदान केंद्र क्रिटीकल म्हणून निश्चीत करण्यात आली आहे. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहरात 4, जळगाव ग्रामीणमध्ये 4, अमळनेर 2 असे एकुण 10 तर रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा तालुक्यात 4, रावेर 6, भुसावळ 11, मुक्ताईनगर 5 असे एकुण 26 मतदान केंद्र क्रिटीकल म्हणून जाहीर करण्यात आली आहे. तर 40 मतदान केंद्र सामाजिकदृष्टया संवेदनशील आहेत.
निरीक्षकांची राहणार नजर
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणुक निरीक्षक म्हणून छोटे लाल पासी यांची तर 4-रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.अजयकुमार यांची नेमणूक केली आहे. तसेच पोलीस यंत्रणेचे निरीक्षक म्हणून असीम विक्रांत मिंज यांची नेमणूक केली आहे. डॉ.अजयकुमार-9422945428, छोटे लाल पासी 9403734003, असिम विक्रांत मिंज 9422945429 असे आहेत. नागरीकांना निवडणुकी संबंधी काहीही तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांचेशी संपर्क साधावा. मतदारांच्या मदतीसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक जिल्हास्तरावर कार्यरत करण्यात आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघात 14 तर रावेर लोकसभा मतदार संघात 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार
उन्मेश भैय्यासाहेब पाटील-भारतीय जनता पार्टी, गुलाबराव बाबुराव देवकर- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, राहुल नारायण बनसोडे-बहुजन समाज पार्टी, अंजली रत्नाकर बाविस्कर- वंचित बहुजन आघाडी, ईश्वर दयाराम मोरे (माजी सैनिक)-बहुजन मुक्ती पार्टी,
मोहन शंकर बिर्हाडे-राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्युलर), शरद गोरख भामरे (सुतार)-राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर), संत बाबा महाहंस महाराज पाटील-हिंदुस्थान निर्माण दल, अनंत प्रभाकर महाजन (अपक्ष), ओंकार आबा चेनसिंग जाधव (अपक्ष), मुकेश राजेश कुरील(अपक्ष), ललीत (बंटी) गौरीशंकर शर्मा (अपक्ष), सुभाष शिवलाल खैरनार(अपक्ष),संचेती रुपेश पारसमल (अपक्ष) हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार
डॉ. उल्हास वासुदेव पाटील-इंडियन नॅशनल कॉग्रेस, रक्षा निखिल खडसे-भारतीय जनता पार्टी, डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते-बहुजन समाज पार्टी, अ जित नामदार तडवी-राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी, अडकमोल रोहीदास रमेश-आंबेडकराईट पाटी ऑफ इंडिया, नितीन प्रल्हाद कांडेलकर-वंचित बहुजन आघाडी, मधुकर सोपान पाटील-हिंदूस्थान जनता पार्टी, रोशन आरा सादीक अली-इंडियन युनियन मुस्लिम लीग, गौरव दामोदर सुरवाडे अपक्ष, तंवर विजय जगन- अपक्ष, नजमीन शेख रमजान- अपक्ष, डी. डी. वाणी (फोटोग्राफर)-अपक्ष हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
जिल्ह्यात 93 तृतीयपंथी मतदार
जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात 64 तर रावेर मतदारसंघात 29 असे एकुण 93 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात 32, जळगाव ग्रामीणमध्ये 2, अमळनेर – 7, एरंडोल- 3, चाळीसगाव -18, पाचोरा- 2, असे एकुण 64 तृतीयपंथी मतदार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा, रावेर आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 1, भुसावळ मतदारसंघात 22 तर जामनेर विधानसभा क्षेत्रात 4 असे एकुण 29 तृतीयपंथी मतदार आहेत. त ृतीयपंथी मतदारांची नोंदणी गतवेळेपेक्षा वाढली आहे.