प्रशासनाच्या विरोधात वाळू वाहतुकदारांचा एल्गार

0

जळगाव। जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत वाळू वाहतूकदारांनी आज जळगाव जिल्हा बिल्डिग मटेरीयल सप्लायर्स युनियनच्या च्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन, महसूल विभागाकडून वाळूवाहतूक करताना येत असलेल्या अडचणी बाबत जिल्हाधिकार्‍यान निवेदन देण्यात आले. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील, शहरातील आणि ग्रामीण भागातील वाळूवाहतूक करणारे विक्रेते मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.

कारवाई व योग्य चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा महसूल विभागातर्फे गिरणा नदी पत्रातील वाळूच्या विक्री बाबत टेंडर काढले होते. त्या नुसार फुफनगरी भाग 2, सावखेडा भाग 2, बांभोरी भाग 1, या गिरणा नदी पत्रातील वाळूचे ठेके लिलावी काढले होते. त्यानुसार विविध ठेकेदारांनी लिलाव झालेले ठेके पैसे भरून घेतले. त्यानुसार कायदेशीर बाबी पूर्ण करून वाळू वाहतूक सुरु करण्यात आली. जळगाव शहरात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहे. मात्र तरी देखील प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात येत असून होणारा अन्याय थांबवा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. वाळूचा लिलाव गेल्या 4 महिन्यापूर्वी करण्यात आला होता. वाळूठेक्याची मुदत सप्टेबर 2017 पर्यत असल्याने तो पर्यत वाहतूक सुरु ठेवण्यात येणार असल्याचे निवेदनातून कळविण्यात आले. प्रशासनाकडून होत असलेल्या कार्यवाही बाबत योग्य चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.