प्रशासनाने कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची यादी जाहीर करावी

0

धुळे । सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर देखील धुळे जिल्हा प्रशासनाने कर्ज माफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांची यादी अद्याप जाहीर केली नाही, याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे जिल्हा उपनिबंधक, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भारतीय स्टेट बँक येथे शेतकर्‍यांसंबंधीत यादी जाहीर करण्यासाठी सरकारचा व जिल्हा प्रशासनाचा धिक्कार करीत निदर्शने केली.

जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर व डीडीसी बँकेतील प्रशासकीय अधिकारी चौधरी यांना यादी जाहीर करण्याबाबत निवेदन दिले आहे. तिव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख हिलाल माळी, डॉ. माधुरी बाफना, हेमंत साळुंखे, गंगाधर माळी, संजय गुजराथी, विलास चौधरी, कैलास मराठे, शेखर वाघ, वामनराव पाटील, प्रफुल्ल पाटील, मंगलसिंग गिरासे, किरण जोंधळे, सुदर्शन पाटील, महावीर जैन, नितीन जगताप, दत्तात्रय सरग, पंकज गोरे, भगवान भदाणे, संदीप शिंदे, ज्ञानेश्‍वर वाघ, डिगंबर जाधव आदींनी दिला आहे.