धुळे । तालुक्यातील देऊर येथील शेतकरी गेल्या 3 वर्षेपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात आहे. बहुतांश शेतकर्यांनी खरीप पेरण्या यंदाही केलेल्या नाहीत. जे पेरणी केलेले पीक होते, त्या खरीप पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. परिसरात नदीनाले व चार लघुप्रकल्प अद्यापही कोरडेठाकच पडले आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खरी वस्तुस्थिती मांडून अहवाल तयार करावा. केवळ रिमझिम पावसावरची सरकारी फुगवलेले आकडेवारी वर न जाता प्रत्यक्षात स्थिती महसूल, कृषी, विमा कंपनी यांनी संयुक्त विद्यमाने जाणून घ्यावी. गावाची नजर आणेवारी 50 पैसे च्या आत लावण्यात यावी, अशा आशयाचे ग्रामस्थांचे सह्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, मंडळाधिकारी छोटू चौधरी यांना ही यांनाही आजच देण्यात आले आहे.
देऊर गावावर तीन वर्षापासून दुष्काळाची झळ
त्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, कामधेनू दुग्ध उत्पादक संस्थानी सर्व साधारण सभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. संबंधित ठरावाची प्रत ही निवेदनासोबत देण्यात आली आहे. सध्या परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी ही खालावली आहे. जनावरांना चारा टंचाई भासत आहे. उत्पन्न घटले आहे. दुष्काळी परिस्थिती असूनही नेर मंडळात सदोष पर्जन्यमापकामुळे चुकीचे आकडे जिल्हा प्रशासनाला दिले जात आहे व सरकारी आकडेवारी फुगवून दिशाभूल केली जात आहे. नेर मंडळात देऊर गावावर अन्याय होऊ नये, ही आर्त हाक येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मांडले आहे. अन्यथा गावातील ग्रामस्थ, शेतकरी आंदोलन छेडतील. सातत्याने तीन वर्षापासून दुष्काळाच्या चक्रात सापडलेला शेती व दुग्ध व्यवसायाला या वर्षी ही धुळे तालुक्यातील देऊर परिसरात दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. रिमझिम पावसावर तग धरून असलेली पिके आता माना टाकू लागले आहेत. गेल्या वर्षी ही नेर मंडळात ढग फुटीची आकडेवारी कागदोपत्री दाखविण्यात आली होती. तालुक्याचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेत शिवारात भेटी द्याव्यात. अशी मागणी होत आहे.
निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
आमदार डी.एस.अहिरे, माजी आमदार जे.यू.ठाकरे, माजी सरपंच नवल बुधा देवरे, विकास संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव देवरे, जेष्ठ नागरिक नवल शेवाळे, वामनराव देवरे, मोतिराम देवरे, जवाहर सूतगिरणी माजी संचालक हिंमतराव देवरे, सामाजिक कार्यकर्ते दिलिप देवरे, काळू देवरे, किरण देवरे आदिं शेतकर्यांनी देऊन, जिल्हाधिकारी दिलिप पांढरपट्टे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा करून, वस्तुस्थिती मांडली.