तर्हाडीे। गुणवत्तावाढ आणि शिक्षण यांचा परस्परसंबंध पाहता प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे असा असून शिक्षणविभाग, पदाधिकारी, यांच्यापेक्षा शिक्षक यांचे कार्यच गुणवत्तावाढ करू शकते त्यासाठी शिक्षकांनी जबाबदारी ओळखून विद्यार्थ्यांना सृजनशील करण्यासाठी प्रशिक्षणातून झालेले परिवर्तन विद्यार्थ्यांपर्यंत न्यावेत असे आवाहन शिरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पी. झेड. रणदिवे यांनी शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान अंतर्गत 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या मुलांचे जलदगतीने शिक्षण प्रशिक्षणाच्या भेटी प्रसंगी केले.
69 शिक्षकांचा सहभाग
24 व 25 जून अशा दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी रणदिवे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांसी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षण हक्क कायदा, वर्ग अध्यापन यावर चर्चा केली. प्रशिक्षणात तालुक्यातील 23 माध्यमिक विद्यालयातील माराठ, इंग्रजी व गणित विषयाचे सुमारे 69 शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणात गटकेंद्रप्रमुख म्हणून प्रदीप पाटील कार्य पहात आहेत. याप्रसंगी आर. टी. ब्राह्मणे, श्रीमती पी. एस. पाटील, पी. व्ही. माळी, सचिन गाडीलोहार, अजय पाटील, जी.आर. बडगुजर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देत आहेत. यावेळी पी. व्ही. पाटील यांनी प्रास्तविक केले. तर आभार ए. व्ही. पाटील यांनी मानले.