धुळे : प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्यांचा शॉक लागून विजेच्या खांबावरच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना साक्री तालुक्यातील सुरपान शिवारात घडली. मयत तरुण हा पाचोरा तालुक्यातील रहिवाशी आहे. पाचोरा तालुक्यातील सुरेश बंजारा हा २३ वर्षीय युवक साक्री वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
उच्चदाब वाहिनी वरील दुरुस्तीचे काम करताना वीज प्रवाह अचानक सुरु झाला. त्यात त्याला जबर शॉक लागला. या घटनेमुळे विज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.