चाळीसगाव। शहरातील गरीब युवक व युवतींकरिता मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग व टेकनॉलॉजी ही सुविधा गरीब युवक युवतींनी या कार्यक्रमाकरिता अर्ज करावेत असे आवाहन चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत प्रशिक्षण कोर्सेस करिता मशीन ऑपरेटर-प्लास्टिक प्रोसेसिंग, मशीन ऑपरेटर – इंजेकशन मोल्डिंग, मशीन ऑपरेटर – टूल रूम, मशीन ऑपरेटर व प्रोग्रामर – ( उछउ – ङरींहश, चरलहळप ेशिीरीेीं ) व प्रोग्रामर, (उछउ – चळश्रश्रळपस व चरळपींरपलपश ेष चरलहळपरीू – ढशलहपळलळरप ) या मोफत प्रशिक्षण कोर्सेस करण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील 8 ते 10 पास असलेल्या युवक युवतींनी 6 महिने कालावधी असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजि (सिपेट), औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाण येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कालावधीत उपस्थित राहणार्या प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था देखील करण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेणार्यांनी 8 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह बालगंधर्व खुले नाट्य गृह बीजे मार्केट जवळ जळगाव येथे स्वतः उपस्थित राहावे. असे आवाहन चाळीसगाव नपाच्या नगराध्यक्षा, उपाध्यक्षा, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी यांनी केले आहे.