जळगाव । विभागीय सहसंचालक, लेखा, कोषागार, नाशिक विभागामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण 24 जुलै ते 29 सप्टेंबर 2017 दरम्यान असल्याची माहिती बाळासाहेब घोरपडे, सहसंचालक, लेखा व कोषागार, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली. नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे. या प्रशिक्षणासाठी अनुक्रमे 08 व 07 मोडयुल्सप्रमाणे निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार यांच्या कोषागार कार्यालयात उपलब्ध आहे.