नवी दिल्ली-आपातकालीन परिस्थितीत कसे बाहेर पडावे याचे प्रात्यक्षिक देत असताना १९ वर्षीय विद्यार्थ्यीनीचा कॉलेजच्या इमारतीतून पडून मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थ्यींनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्यास तयार नव्हती. मात्र बळजबरीने ट्रेनरने तिला खाली ढकलले यावेळी छताला डोके आपटून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात कोईंबतूर पोलिसांनी ट्रेनरला ताब्यात घेतले आहे. कोईंबतूरमधल्या कोवाई कलाईमगल कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
#UPDATE: Coimbatore rural police have arrested a trainer of National disaster mgmt training in connection with death of 2nd year BBA student at Kovai Kalaimagal College of Arts&Science, Lokeshwari. She died after falling from 3rd floor of her college building y'day. #TamilNadu https://t.co/1RZaDcBsg5
— ANI (@ANI) July 13, 2018
कॉलेजमधल्या मॉक ड्रिलचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. कॉलेजमध्ये आपातकालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रात्यक्षिक सुरू होते. राष्ट्रीय आपातकालीन व्यवस्थापनाकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावर जमले होते. या विद्यार्थ्यांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचे प्रशिक्षण ट्रेनर देत होते. तसेच उडी मारणाऱ्या मुलांना झेलायला जाळी पकडून काही विद्यार्थी खाली उभे होते.
Disaster preparedness drill turns lethal in Coimbatore. 19-years-old girl dies during the drill. #ITVideo #Breaking
Watch more videos at https://t.co/Nounxo6IKQ pic.twitter.com/2SnYnuXUiC— India Today (@IndiaToday) July 12, 2018
पाच विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या हे प्रात्यक्षिक पार पाडले. ट्रेनरने तिला कोणताही विचार न करता तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यावेळी लोगेश्वरीच्या डोक्याला भिंतीचा मार बसल्यानं गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तातडीनं कोईंबतूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत करण्यात आलं. या प्रकरणात ट्रेनरला अटक करण्यात आली आहे.