प्रश्नपत्रिका आराखडा बदलण्यासाठी राज्यस्तरावर तज्ञांची निवड

0

शहादा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 11 व 12 वी सायन्स विषयाच्या प्रश्नपत्रिका आराखडा बदलण्याचे निश्चित केले आहे. शैक्षणिक वर्ष 2017 -18 पासुन राज्य शिक्षण मंड्ळाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा बदलण्यासाठी राज्यस्तरीय तज्ञांची निवड केली आहे. यात मंडळाच्या धोरणानुसार विविध विषयाच्या प्रश्नपत्रिका सुधारित आराखड्यानुसार प्रश्न पेढी तयार करण्यात येणार आहे. यात पुज्यसाने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संचलित उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. डी. सी. पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष किशोर पाटील सचिव श्रीमती कमलाताई पाटील समनवयक प्राचार्य मकरंद पाटील आदिनी अभिनंदन केले आहे.