भुसावळ। शेतकर्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरु केले असून ‘मी कर्जमुक्त होणारच’ हे अभियान भुसावळ तालुक्यात सुरु केलेला होता. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी अर्ज गोळा करून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार आहे. त्यानिमित्त टाहकाळी, काहूरखेडे, बोहार्डी, वझरखेडे येथे शेतकरी बांधवांशी मी कर्ज मुक्त होणारच या विषयी तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मूळे, प्रा. धिरज पाटील, शिक्षक सेनेचे विनोद गायकवाड, अबरार खान, अजय पाटील यांनी चर्चा केली.
शेतकर्यांना विचारले 12 प्रश्न
या अभियानामध्ये 12 प्रश्नाची प्रश्नावली शेतकर्यांकडून भरुन घेऊन मुख्यमंत्री यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. या अर्जात नोटबंदीचा निर्णय, पीक विमा योजना, भारनियमन, शेततळे, मागेल त्याला शेततळ्याची घोषणा, शेतमालास हमीभाव, कर्जवसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का? आदी प्रश्नांचा समावेश आहे. कंडारी, तळवेळ, साक्री, फेकारी, वरणगाव, झेडटीसी परिसर, कठोरा बुद्रुक, कठोरा खुर्द, फुलगाव, साकेगाव, पिंपरीसेकम व जाडगाव तसेच भुसावळ तालुक्यातील सर्वच गावातील शेतकर्यांकडून अर्ज भरुन घेतला जाणार आहे असे विलास मुळे यांनी सांगितले. याप्रसंगी बाळू माळी, यशवंत बढे, बापू मराठे, गोविंदा चौधरी, विकास पाटील, नितिन मराठे, विकास पाटील, अजय पाटील, शुभम सोनार, विजय तायडे, अबरार खान, निलेश ठाकुर, निखिल सुरवाड़े, नितिन सोनवने, संभाजी पाटील, राजेंद्र तायडे, हेमंत तायडे, सीताराम तायडे, रमेश धरने, शिवा भोई, किशोर कोळी, राम शेटे, अतुल शेटे, निळू झोपे, सुभाष झोपे, सुभाष चौधरी, सुरज पाटील हे सुद्धा उपस्थित होते.