जळगाव । अमळनेर येथील श्री.संत सखाराम महाराज संस्थांचे गादपती ह.भ.प. प्रसाद महाराज यांचे बुधवारी 31 रोजी सायंकाळी शहरात आगमन झाले. तीन दिवस जळगाव शहरातील विविध भागात भक्तांच्या घरी पाद्यपूजा व पानसुपारीचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी त्यांनी श्रीराम मंदीर संस्थानात मुक्काम केला. आज गुरुवारी 1 रोजी जिल्हा पेठ, नवी पेठ, अयोध्या नगर, व एम.जे. कॉलेज परिसरात पानसूपारी होणार आहे. 2 रोजी आदर्श नगर व महाबळ परिसर, मोहन नगर, संभाजी नगर, त्र्यंबक नगर, या भागात कार्यक्रम होणार आहे. 3 ला सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर अमळनेरकडे रवाना होणार आहे.