मुंबई – चेंबूर नाक्यावरील पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, यासंदर्भात पालिकेच्या संबंधित अधिकार्यांकडे तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. या प्रसाधनगृहाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.