फैजपूर सतपंथ संस्थानतर्फे पत्रकारांचा सत्कार
फैजपूर- पत्रकारांना एक बातमी घेण्यासाठी किती धावपळ करावी लागते हे पत्रकारांना माहित आहे. त्या बातमीची सत्यता आधी पहावी लागते म्हणून प्रसार माध्यमांमुळे खरी लोकशाही जिवंत असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले. पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी शास्त्री भक्तीकिशोर दासजी, प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, तापी परीसर विद्या मंडळाचे चेअरमन लिलाधार चौधरी व स्वामिनारायण गुरुकलचे सचिव पी.डी.पाटील उपस्थित होते.
सतपंथ संस्थानतर्फे पत्रकारांचा गौरव
सतपंथ संस्थानतर्फे 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, निलेश पाटील, समीर तडवी, नंदकिशोर अग्रवाल, राजेंद्र तायडे, संजय सराफ, सलीम पिंजारी, राजू तडवी, शेख शाकिर मलिक, ईदू पिंजारी, शेख कामील यांचा सत्कार करण्यात आला. 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. दुपारी 3 वाजता पालिका सभागृहात छोटे खानी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, रशीद तडवी, देवेंद्र साळी, रवींद्र होले, डॉ.इमरान शेख, शेख इरफान, मलक आबीद, रघुनाथ कुंभार, शहाबाज खान, रईस मोमीन उपस्थित होते.