प्रसिद्ध ब्रँडसाठी दीपिका-रणबीर पुन्हा दिसणार एकत्र

0

मुंबई : दीपिका आणि रणबीर पुन्हा एकत्र झळकणार आहे. मात्र यावेळी ते कोणत्याही चित्रपटासाठी न्हवे तर एका प्रसिद्ध ब्रँडसाठी एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणबीर यांनी डिझायनर मनीष मल्होत्राच्या रँपवर सोबत वॉक केला होता. याचे फोटो बरेच सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.

या प्रसिद्ध ब्रँडसाठी दीपिका लग्नानंतर कामाला सुरुवात करणार आहे. माहितीनुसार, या ब्रँडवर दीपिकाला घेऊन बरीच चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही डिल फायनल झाल्यानंतर तिला कळाले, रणबीर कपूरही या ब्रँडमध्ये सहभागी होणार आहे. हे ऐकून ती खूप उत्साहित झाली आहे.