प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली: ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर सोशल मीडियात प्रचंड गाजला. अबालवृद्धांपासून सगळेच या शेरच्या प्रेमात पडले होते. तरुणांनी तर अक्षरश: या शेरला डोक्यावर घेतले होते. हा शेर आहे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:हून याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.

“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती.

करोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेते, बॉलीवूड जगतातील सिलीब्रेटी सगळेच करोनाच्या विळख्यात सापडले आहे.