प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 362 प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मंजूर

शहादा :- प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित समितीच्या बैठकीत निवडश्रेणी मंजूर करण्यात आलेली आहे. एकाच पदावर प्रशिक्षित पदाच्या शैक्षणिक अर्हतेसह पदवी संपादन करुन सलग 24 वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करणा-या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी साठी विचारक्षेत्रात घेण्यात येते. प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरीकामी शासन निर्णय दि.11 फेब्रुवारी, 1991 नुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, समिती सदस्य सचिव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व समिती सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आहेत. प्रस्तावित करण्यात आलेल्या 1011 प्रस्तावांपैकी शासन नियमांनुसार विहीत निकषांची पूर्तता असणारे कागदपत्र प्रस्तावात सादर करणा-या एकूण 403 पैकी सेवाजेष्ठतेनुसार पात्र ठरणारे एकूण 362 प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली असून प्रस्ताव पूर्ण असणा-या मात्र सेवाजेष्ठतेत बसत नसलेल्या व कागदपत्र अपूर्ण असणा-या एकूण 649 प्रस्तावांना तुर्तास मान्यता देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी प्रशासनाकडे वारंवार वेतनश्रेणी संदर्भात पाठपुरावा सादर करण्यात आलेला होता. सदर प्रकियेत .सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी,. ए. जे. तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) प्रविण अहिरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सतीश एस. चौधरी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), . वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी .एस.पी. जाधव व . सतिष गावीत तसेच कनिष्ठ सहाय्यक श्री. सुनिल गिरी यांनी परिश्रम घेतले आहेत. प्रशासनाचे प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.