जैताणे । परिसरातूनच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात खुडाणे गावाचे नाव लोकसहभागातून निर्माण केलेल्या ज्या घटबरी धरणामुळे प्रसिद्ध झाले त्या धरण निर्माण कार्याचे मुख्य मार्गदर्शक प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी शनिवारी धरणाला भेट दिली. जिथे शासन निधी देण्यास असमर्थ ठरले त्याठिकाणी मिसाळ यांच्या सारख्या अधिकार्यांनी खुडाणे गावकर्यांना लोकसहभागातून धरण निर्मितीचा मोलाचा सल्ला दिला. हे धरण लोकसहभागातून निर्माण होऊ शकते आणि तुम्ही खुडाणे ग्रामस्थ हे काम करू शकतात ही भावना त्यांनी लोकांच्या मनात उतरवली. तसेच धरणासाठी मार्गदर्शक म्हणून अभियंता ए.सी.पाटिल यांची नियुक्ती केली. 5 हजार 100 रुपये रोख देऊन लोकसहभाग देखील नोंदविला. मिसाळ यांनी धरणाला वेळोवेळी भेट देऊन कामाचा आढावा घेत असतात.
श्रमदानातून पुर्नबांधणी
श्रमदान करून एवढया मोठ्या धरणाची पुर्नबाधणी करून खुडाणे ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला आहे. या गावाचा उल्लेख कोठेही आदराने व उदाहरणादाखल देत असतो असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी सांगितले. धरणात साठवलेल्या जलसाठ्याने येणार्या काळात शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सूटनार असून कामासाठी सरपंच व गावकर्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी ए.पी.आय.खेळकर, प्रा.अजय चांडक, जलक्रांतीचे प्रणेते हर्षल विभांडीक, निजामुर मंङळ अधिकारी चित्ते, तलाठी रोजेकर, संरपच प्रतिनिधी पराग माळी, उपसंरपच नामदेव गवळे, धनराज माळी, कन्हैयालाल काळे, महेद्र हेमाडे, पांङुरग महाले, शाना देवरे, शरद गवळे, दिनेश गवळे, गणेश गवळे रोजगार सेवक मनोज माळी आदी उपस्थित होते.