बारामती । भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला बारामती शहर व परिसरातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्त्तराधिकारी, पंचायत समिती सभापती संजय भोसले, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, तहसिलदार हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी प्रमोद काळे, मुख्याधिकारी मंगेश चितळे आदींसह शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा निकम व तहसिलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.