प्रांत कार्यालयासमोर दलित पँथरतर्फे धरणे आंदोलन

0

भुसावळ । शहरातील रस्ते, सिग्नल यंत्रणा, अतिक्रमण, तसेच पाणीपुरवठा अशा विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवार 3 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे प्रांताधिकारी चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सिग्नल यंत्रणेसह सीसीटीव्ही बसवावे
या निवेदनात नमूद मागण्यांमध्ये लोखंडी पुल परिसर, गवळी वाडा, गांधी पुतळा परिसर, वसंत टॉकीज या परिसरातील रस्त्यांची त्वरीत सुधारणा करण्यात यावी. मुख्य मार्गावर झेब्रा क्रॉसिंग तसेच मार्ग फलक लावण्यात यावे. वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक मुतार्‍या बांधण्यात याव्या. मुख्य चौकातील सिग्नल यंत्रणा सुरु करुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचे सुशोभिकरण करावे. बाजार हद्दीतील अतिक्रमण हटविण्यात यावे. धम्मनगर परिसरात 12 सिटच्या शौचालयाची व्यवस्था करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भव्य प्रवेशद्वार बांधण्यात यावे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. या मागण्यांची पुर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. यावर सिध्दार्थ सोनवणे, सुदाम सोनवणे, विजय साळवे, प्रेमचंद सुरवाडेे, राजू तायडे, मयुर सुरवाडे, राजू महाले, गोविंदा सोनवणे, रितेश नायके आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.