प्राकृतावर मात करत विकृत मूल्य जोपासल्यामुळे मुलींचा जन्मदर कमी झाला

0

डॉ.राजेंद्र फडके : ज्ञानपूर्णा विद्यालयात बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम

मुक्ताईनगर- प्राकृतावर मात करून विकृत मूल्य जोपासल्यामुळे समाजातील मुलींचा जन्मदर कमी झाल्याची खंत बेटी बचाव बेटी पढाव या योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी तालुक्यातील इच्छापुर-निमखेडी येथील ज्ञानपूर्णा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमादरम्यान व्यक्त केली. ही योजना पसरवण्यासाठी संपर्क व संवाद वाढवणे गरजेचे असून संवादातूनच सर्व समस्या दूर होतात. आरक्षणातून महिला लोकप्रतिनिधी होतील मात्र त्यांनी त्यांचे कार्य स्वतः करावे व कारभार पतीच्या ताब्यात देऊ नये, असेही फडके म्हणाले.

मुलींचा जन्मदर आला 910 वर
डॉ.फडके म्हणाले की, दूरदृष्टीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवव्या क्रमांकाची योजना सुरू केली असून देशात पूर्वी 850 चा जन्मदर मुलींचा होता तो आता 910 वर येऊन ठेपला आहे. देशाचा लिंग दर हा सरासरी 929 एवढा असून त्याच्या खाली असलेल्या 141 जिल्ह्यांची निवड आपण योजनेद्वारे केली आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातील त्यात 16 जिल्हे असून त्यात जळगाव, बुलढाणा, नाशिक व पुण्यासारखे जिल्हे आहेत. हे आपले दुर्दैव आहे. डॉक्टरांनी ऍक्टिव्ह ट्रॅकर बसवावे जेणेकरून गर्भलिंग तपासणी होणार नाही. ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या पंचमहाभूतांनी जबाबदारीने खेडेगावात काम केले तर मुलींचा जन्मदर देशात बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासदेखील डॉ.फडके यांनी व्यक्त केला.

गर्भपाताच्या प्रमाणामुळे विषमता वाढली -माजी मंत्री खडसे
मुलींना जन्माला येऊ द्या व फुलपाखराप्रमाणे उडू द्या, असा संदेश देणार्‍या रांगोळी स्पर्धेचे कौतुक माजी महसूल मंत्री यांनी आपल्या भाषणातून प्रसंगी केले. पुरुषांच्या बरोबरीने पूर्वी महिलांची संख्या होती मात्र विज्ञानाचा दुरुपयोग करत गर्भपाताचे प्रमाण वाढल्याने विषमता निर्माण झाली. जन्मदर अंतर कमी झाले पाहिजे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे व त्या उपक्रमाची डॉ.राजेंद्र फडके हे प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहेत. श्री शक्तीचा जागर करण्याच्या दृष्टिकोनातून तसेच मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षणात गुणवत्तापूर्वक शिक्षण पोचवण्यात ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई यांचे कार्य महान आहे, असे गौरवोद्गारदेखील त्यांनी या प्रसंगी काढले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए.भोई होते. जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, जिल्हा परीरषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, मुक्ताईनगर पंचायत समितीच्या सभापती शुभांगी भोलाण, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजू सावडे, विनोद पाटील, पुंडलिक पाटील, नीरज बोराखडे, चंद्रकांत भोलाण, सुनीता पाटील, लिलाबाई पवार, अनिल वाडीले, भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, सुभाष पाटील, रसाळ चव्हाण, प्रभुदास जाधव, आसीफ खान, संजय पाटील, डॉ.विष्णू रोटे, रतीराम पाटील, नगराम चव्हाण, प्राचार्य एन.आय.पाटील हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य मुन्ना बोंडे, विनायक वाडेकर व ज्ञानपूर्णा विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. परीसरातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिला सरपंच म्हणून इच्छापुर गावच्या कोकीळाबाई धात्रक आणि निमखेडीच्या सरपंच शशिकला कांडेलकर यांचा देखील गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यांनी घेतले परीश्रम
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा आणि वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण देखील करण्यात आले. सूत्रसंचालन विनायक वाडेकर यांनी तर आभार प्राचार्य एन.आय.पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी मुन्ना बोंडे, सी.बी.मोरस्कर, भानुदास मुळक, प्रा.विद्या मंडपे, मीनल कोल्हे, जी.एम.पवार, भगवान महाजन, राहुल मुळे, संजय भडांगे, अंबादास लोने, उत्तम बेलदार, गोपाळ निंबोडे, आशिष धाडे, सुरेश वानखेडे, रमेश वानखेडे, बाबुराव बोंडे, गोपाळ येरुकार तसेच ज्ञानपूर्णा विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.