नंदुरबार तालुक्यातून ४८ संघांचा सहभाग ; दूरचित्रवाणीवरील प्रो कबड्डीमुळे वाढला सहभाग
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलचा १४ व १७ वयोगटात विजय ; जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन
नंदुरबार । क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यावतीने व नंदुरबार तालुका विधायक समितीच्या सहकार्याने नंदुरबार तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अभियंता केदार पाटील, मुख्याध्यापक मनोज मराठे, क्रीडा संघटक प्रा.मयुर ठाकरे, अतुल पाटील, बालाजी सलगर, अनिल रौंदळ, तालुका क्रीडा संयोजक मिनल वळवी, प्रा.सुदाम घाटे, ए.एस.पाटील, घनश्याम लांबोळे, आर.डी.पाटील आदी उपस्थित होते.
तलवाडे आश्रमशाळा विजयी
या स्पर्धेला तालुक्यातील १४, १७, १९ वर्ष वयागोटाचे मुले व मुली अशा एकुण ४८ संघांनी सहभाग नोंदविला. यात १४ वर्ष वयोगटात मुलांमध्ये अनुदानित आश्रमशाळा, तलवाडे विजयी, तर मुलींमध्ये डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार विजयी, १७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये डी.आर.हायस्कुल, नंदुरबार विजयी तर मुलींमध्ये डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार विजयी, १९ वर्ष वयोगटात मुलांमध्ये जी.टी.पी.महाविद्यालय, नंदुरबार विजयी तर मुलींमध्ये यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार हे विजयी झाले.
शहराप्रमाणे ग्रामीण भागात के्रझ
या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना पुष्पेंद्र रघुवंशी म्हणाले, की प्रो कबड्डीमुळे कबड्डीचे प्रस्त वाढले आहे. व यामुळेच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूंना घरबसल्या दूरचित्रवाहिणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डीचे सामने पहावयास मिळत आहेत. यावेळी स्पर्धेला पंच म्हणून जितेंद्र पगारे, बालाजी सलगर, राकेश माळी, राजेश चौधरी, योगेश माळी, आकाश वळवी, निलेश गावीत आदींनी काम पाहीले.
यांनी पाहिले काम
मुले आता बैठे खेळ खेळण्याकडे वळत असतांना कब्बडी या मैंदानी खेळात घेतलेला सहभाग उल्लेखनीय होता. शालेय कब्बडीस्पर्धेत मुलांसह मुलींनीही सहभाग नोंदविला होता. यात नंदुरबार तालुक्यातून ४८ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धायशस्वीतेसाठी सौरभ कानोसे, किरण पावरा, मनिष सनेर, भरत कुंभार, संजय वसावे, थित्या पावरा आदींनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मयुर ठाकरे तर आभार प्रा.सुदाम घाटे यांनी मानले.