प्राचार्य लियाकत शेख यांना मातृ शोक

0

मुरबाड : गोरख गडाचे पायथ्याशी वसलेल्या देहरी गावचे रहिवासी असलेले.भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्राध्यापक लियाकत शेख सर यांच्या मातोश्री सुन्नबी रब्बानी शेख यांचे वयाच्या ८८व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच पुत्र व १६ नातवंडे असा परिवार आहे.

मातोश्री सुन्नबी शेख या अशिक्षित असतानाही त्यांनी परिसरातील गरजुना लोकांना सुख दुख:त चांगल्या पध्दतीने मदतीचा हात दिला. शिवाय आपल्या पतीसोबत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आपल्या पाच मुलांना उच्च शिक्षण दिले. ते आज शासकीय नोकरी करुन आई वडिलांचा वारसा घेत समाज कार्यात अग्रेसर आहेत. या मातेच्या अंतयात्रेत माजीमंत्रु जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, आ.दिगबंर विशे, राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू, टीडीसीचे माजी अध्यक्ष उल्हास बांगर, नगराध्यक्ष किसन कथोरे, जयवंत सुर्यराव, रमेश हिंदुराव, नारायण गोंधळी यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवर, हजारो नागरिक सहभागी झाले होते.