यावल। येथील बसस्थानक परिसरात एक प्राचीन पायविहीर असून पुरातत्व वारसा आहे. शहरात असलेल्या काही मोजक्या पुरातत्व अवशेषांपैकी एक असलेल्या या पायविहिरीची सद्यपरिस्थितीला मानवी हस्तक्षेपामुळे दुर्दशा झाली असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून हा प्राचीन वारसा जपण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवकांत पाटील यांनी केली आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
पायविहिरीच्या आजुबाजुला असलेल्या काही चहाची दुकाने, पानटपर्या आणि हॉटेल तसेच फळवाले आहे. वरील हे सर्व लोक आपआपल्या दुकानावरील, टपर्यावरील, हॉटेलमधील सर्व घाण, कचरा तसेच प्लॅस्टीक यासारख्या घाण वस्तू त्या पायविहिरीमध्ये कचरा टाकण्यासाठी उपयोग करत आहे. तसेच ऐेतिहासिक पायविहिरीची सध्या कचराकुंडीची अवस्था झाली आहे. तसेच त्या कच्याला पेटविले जाते. दर 8 ते 15 दिवसांनी तो कचरा जाळतात. त्यामुळे मोठी अग्नी व धुर निर्माण होतो. आजुबाजुच्या सर्व दुकानांना आग लागण्याचा धोका आहे. आर्थिक नुकसान तसेच जिवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसे झाल्यास आपणाकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही व धुरामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो व रोगराई पसरते. पर्यावरणावर वाईट परिणाम होवून पर्यावरण संतुलन राखण्यात अडथळा होत आहे. पर्यावरणाची व ऐतिहासिक वास्तुची हानी होत आहे. त्यामुळ या गोष्टीवर योग्य ती खबरदारी घ्यावी आणि प्रकार बंद करावा. अन्यथा आंदोलन तसेच उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात पाटील यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पुरातत्व विभागास निवेदनाच्या प्रती दिल्या आहे.