प्रात्यक्षिकाचे रायसोनी मंडीतून वस्तू विक्रीचे धडे

0

जळगाव ।शहरातील काव्यरत्नावली चौक, एम.जे.कॉलेज, आय.एम.आर कॉलेज, ख्वाजा मिया चौक, नूतन मराठा, टॉवर चौक, बस स्थानक, आकाशवाणी, गोलाणी मार्केट आदी स्थळे रायासोनीच्या विद्यार्थ्यांनी वस्तू विकण्यासाठी गाठलेत. या माध्यमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळली. व्यवसाय करणे खूप कठीण नाही व सोपेही नाही. पैश्याचे मुल्य किती महत्वाचे आहे याची देखील जाणीव रायसोनी मंडीतून झाली असे मत यश चोरडिया, विशाल वाणी, दीपक व्यास, विनिता कालराणी, सुमीत पारप्यानी, प्रशांत पटेल, अनिरुद्ध शर्मा हर्शल यांनी रायसोनी मंडीच्या समारोपा प्रसंगी व्यक्त केले.

अनुभवातून विद्यार्थी घडावे
व्यवस्थापन शास्राचे विद्यार्थी अनुभवातून घडावेत, प्रत्येक्ष विक्रीचे अनुभव, ग्राहकांनी विचारलेले प्रांशांची उत्तरे देताना होणारी दमछाक, त्यासाठी करावी लागणारी कसरत त्यामुळे रायसोनी मंडी हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी झाला. या माध्यमातून विद्यार्थी फक्त विक्री आणि व्यवस्थापन शिकत नसून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांची मानसिकता जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळली. सूत्रसंचालन प्रा.राहुल त्रिवेदी आभार प्रा.तन्मय भाले यांनी मानले. समन्वयक प्रा.राजकुमार कांकरिया, प्रा.दीपक शर्मा, प्रा.अनिल शर्मा, प्रा.प्रशांत देशमुख, प्रा.शमा पोतनीस यांनी काम पाहिले.