अमळनेर। येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीस मोफत कर्ण यंत्राचे वाटप करण्यात आले. इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थीनी कामिया शेख तमीजबी हिला ऐकता व बोलता येत नसल्यामुळे तिला शिक्षण घेतांना बर्याच अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे पंचायत समितीमार्फत प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मोफत कर्णयंत्रची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मोफत कर्णयंत्र तिला देण्यात आले. एकाच कुटंबातील तिन्ही बहिणींना बोलता व ऐकू येत नाही. इतर दोघांचे प्रस्ताव जिल्हापरिषदेला पाठविले असल्याचे मुख्याध्यापक विनोद ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थीनीचे पालक, उपशिक्षक ज्ञानेश्वर भदाणे, अमोल पाटील, भरत पाटील, प्रशांत कापडने, प्रदीप सैंदाणे, राहुल चव्हाण, प्रविण तेले आदी उपस्थित होते.