जळगाव । जिल्हा परिषद शिक्षकांनी त्यांच्यावरील वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे तसेच शासनाचे दररोज येणार्या आदेशांनी त्रस्त होवून राज्यभरात आंदोलन पुकरले आहे. यानुसार आज जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मूक मोर्चा आणला होता. या मोर्चांत शिक्षक, शिक्षीका तसेच त्यांचे परिजणसुद्धा सहभागी झाले होते. या मोर्चांची सुरूवात जिल्हा परिषदे समोरील श्यामाप्रसाद उद्यानातून दुपारी 1 वाजून 45 मिनीटांनी शिस्तीत काढण्यात आला. मोर्चांत सहभागी आंदोलकांनी त्यांच्या हातातमध्ये लक्षवेधी व मार्मिक असे फलक घेतले होते. या मोर्चेकर्यांनी ‘शिक्षकांचे एकच मिशन जुनी पेंशन जुनी पेंशन‘, ’केंद्र शाळांना डाटा ऑपरेटर मिळालाच पाहिजे’ ‘बदली धोरणातील त्रुटी दूर झाल्याच पाहिजे‘ आदी मागण्यांचे फलक हातात घेतले होते.