प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणीक उपोषण

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्हयातील प्राथमिक शिक्षक समन्वय समीतीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालया समोर शनिवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत शिक्षकांना अनेक समस्या भेडसावत असून याबाबत एक निवेदन सादर करण्यात आले. यात म्हटले आहे की, प्राथमीक शिक्षकामधून मुख्याध्यापकांच्या पदोन्नती व्हाव्यात, गेल्या चार वर्षापासून सदर पदोन्नत्या प्रस्तावित आहेत मात्र, याबाबत कार्यवाही होत नाही, तसेच पदविधर शिक्षक केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्याही पदोन्नत्या झालेल्या नाहीत त्या रिक्त पदामुळे जवळपास ३५०च्या वर शाळा मद मंजुर असूनही बिना मुख्याध्यापकाच्या आहेत. शिक्षक बदल्यांमध्ये अन्याय झालेल्या पती पत्नी व इतर शिक्षकांच्या शासननिर्णय व दिलेल्या मार्गदर्शक सुचने नुसार बदल्याबबत जि.प.स्तरावर कार्यवाही होत नाही, पगाराबाबत नेहमीच अनियमीतता असणे, वेतन श्रेणीच्या फरकाची बीले व मेडीकल बिले विलंब होत असतो.शासन स्तरावरून येणारी परिपत्रक व शासन निर्णय व मार्गदर्शक सुचनांची अधिकृत प्रत न मिळता फक्त व्हॉटस्अप यंत्रणेव्दारे चालु असलेली सिस्टीमबंद करावी, अंशदायी पेंशन योजनेची कर्मचार्‍यांना हिशोब पावती मिळावी, तसेच मयत झालेल्या कर्मचाच्यांच्या वारसांना पेन्शनिधी तात्काळ मिळावी, शिक्षण सेवकांना नियमीत शिक्षकांची वेतनश्रेणी तात्काळ लागू करवी, निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांना निवड श्रेणी लागू करावी आदी मागण्यांसाठी समन्वय समिती सदस्यांनी हे उपोषण केले. जर शिक्षकांच्या समस्या सुटल्या नाही तर या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आता देण्यात आला आहे.