प्राथमिक शिक्षक राष्ट्र निर्मितीचा आधार 

0

जळगाव

प्राथमिक शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचा आधार आहे. गावाच्या प्रगतीसाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षक आपल्या ज्ञानदान व अभिनव उपक्रमातून गावासह राष्ट्र निर्मितीच्या कार्यात मोलाचे योगदान देत असतात, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी केले.

पाल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक जितेंद्र गवळी लिखित ‘एका गुलाबी गावाची गोष्ट’ पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, डाएटचे माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, साहित्यिक के. के. अहिरे, अ. फ. भालेराव, डॉ. मिलिंद बागुल, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे, सरला पाटील उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या ५ गावांमध्ये गुलाबी गावांसारखे विविध उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या कामासाठी मदत करण्याचे आश्वासन लेखक जितेंद्र गवळी यांनी दिले. शिक्षकाने विद्यार्थी हितासोबतच गावाला दिशा देण्याचे काम करावे, अशी अपेक्षा नीळकंठ गायकवाड यांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. मिलिंद बागुल यांनी यांनी गवळी यांच्या पुस्तकांचे समीक्षण केले. डी. के. अहिरे, अ. फ. भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात जितेंद्र गवळी यांनी गुलाबी गावासाठी केलेले प्रयत्न, अनुभव कथन केले. गणेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.  जितेंद्र गवळी लिखित पुस्तकाचे प्रकाशन  लिखित ‘एका गुलाबी गावाची गाे‌ष्ट’ पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू पी. पी. पाटील, गणेश राउत, अ. फ. भालेराव, के. के. अाहिरे, नीळकंठ गायकवाड, मिलिंद बागुल, राजंेद्र सपकाळे  .