प्राथमिक शिक्षक संघ कोरोनाग्रस्तांसाठी देणार एक दिवसाचे वेतन

0

जळगाव – कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी दिली. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असून शासन या जागतिक महामारीचा अतिशय नियोजनबद्ध रित्या सामना करत आहे. लोकांचे आरोग्याबरोबरच जीवनावश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी शासन अहोरात्र प्रयत्न करत आहे.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या कठीण परीस्थितीत शासना बरोबर असून, सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सर्व शिक्षक सभासद स्व ईच्छेने एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणे बाबत निर्णय घेतला आहे. यापुढेही शासनास सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. माहे मार्च/ एमिहिन्याच्या मासिक वेतनातून रक्कम देण्याबाबत पत्र मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले आहे, असे अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी कळविले आहे.