प्राथमिक शिक्षण म्हणजे भविष्यातील संस्कारांची पायाभरणीचे केंद्र

0

चाळीसगाव  । पुर्व प्राथमिक शिक्षण हे भविष्यातील उत्कृष्ट संस्कारांची पायाभरणी करणारे आदर्श केंद्र आहे. या केंद्रावर लक्ष केंद्रित करून ज्ञान दानाचे पवित्र कार्य संस्काराने संपन्न झाले तर संस्कारशिल नागरीक निर्माण होण्यास मोलाचा हातभार लागेल, असे प्रतिपादन रोटरी कल्ब ऑफ मिल्क सिटी आयोजित पुर्व प्राथमिक शिक्षण व अध्यपन पध्दती या विषयावर प्रा. सुनिता जाधव यांनी बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लालचंद बजाज व सचिव डॉ. संतोष मालपुरे, प्रा. सुनिता जाधव उपस्थित होत्या.

मुलांवर बालपणीच चांगले संस्कार करा
सुनिता जाधव पुढे म्हणाल्या कि, पुर्व प्राथमिक शिक्षणावर आज फक्त प्रवेशापुरता जोर दिला जातो. मात्र त्यांना उत्तम शिक्षण कसे दिले जाईल यावर भर दिला गेला पाहीजे. या मुलांकडे लहान म्हणून जरूर पहा, मात्र त्यांची आकलन शक्ती व समजून शिकण्याची वृत्ती प्रचंड असते या आकलन शक्तीद्वारा त्यांना दैनदिन जीवनात रामायण, महाभारत, उत्तम नागरीक, देशसेवा, उत्तम कामगिरी यांची माहीती दिली तर त्यांचेवर चांगले संस्कार बालपणीच होण्यास मदत होईल. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद यांची उदाहरणे पाहीली तर लहानपणी त्यांच्या आईने गोष्टींद्वारा त्यांचेवर संस्काराचे मुल्य रूजविले. आज आपल्याला ही गोष्टींद्वारा हे संस्कार रूजविण्याचे कार्य करावयाचे आहे. मात्र,ही जागा वडीलधार्‍या आजी-आजोबाच गोष्टी सांगतात, आई-वडीलांनी ही आपली जबाबदारी समजून घेतली पाहीजे. खर्‍या अर्थाने पालकत्वही चांगले निभाऊ शकतात.

मुले असतात सृजनशिल
शिक्षक हा मुलांना शिकवतो. मात्र अंतरंगात पाहीले तर मुलांकडूनच दररोज नवनविन शिकण्यास मिळत असते. मुले ही सृजनशिल असतात. या सृजनशिलतेचा उपयोग देशसेवेत करून घेतला तर उद्याचे उत्तम नागरीक घडविण्याचे आदर्श कार्य यात होवू शकते, म्हणून पालक, शिक्षक यांनी पुर्व प्राथमिक शिक्षण हे डोळसपणे दिले पाहीजे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सचिव डॉ. संतोष मालपुरे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालक प्रा. चंद्रकांत ठोंबरे यांनी केले. आभार प्रकाश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास केशव आप्पा कोतकर, भरत दायमा, भालचंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतले.