पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे प्राधिकरणातील तीन अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात आली. यातील म्हाळसकांत विद्यालयाकडे जाणार्या रस्त्यावरील मंदिर पाडताना कारवाईस नागरिकांचा विरोध झाला. पदपथावरील अतिक्रमणांकडे पालिका लक्ष देत नाही मंदिरांवरच कारवाई का, असा प्रश्न नागरिकांनी केला. मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई पार पाडण्यात आली.