प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

0

चाळीसगाव/धरणगाव । ज्यु नियर कॉलेजचे शिक्षक व प्राध्यापक यांच्या जवळपास 32 मागण्यांसाठी आज चाळीसगाव व धरणगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनाच्या वतीने 8 डिसेंबर रोजी शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यांना नायब तहसिलदार विशाल सोनवणे चाळीसगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टप्याटप्याने आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष प्रा. अविनाश पाटील यांनी सांगीतले आहे. तर धरणगाव जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना यांच्याशी संलग्न असलेले धरणगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनातर्फेही आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत विविध मागण्यांचे तहसीलसमोर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दोन्ही तालुक्यातील शिक्षकांसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

धरणगाव तहसीलसमोर आंदोलन
धरणगाव । जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना यांच्याशी संलग्न असलेले धरणगाव तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनातर्फेही आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलसमोर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.एस.आर.पाटील, प्रा. उमेश पाटील, प्रा.एम.आर.कांडेलकर, प्रा.एच.एम. मेहतर, प्रा.आर.आर. पाटील, प्रा.बी.एल.खोंडे, प्रा.ए.आर.पाटील, प्रा.डी.डी.पाटील, प्रा.सौ.आर.जे.पाटील, श्रीमती चौधरी, प्रा.आर.ए.पाटील प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.

शिक्षकांच्या या आहेत मागण्या
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांसाठीची नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करावी, कायम विनाअनुदान तत्वावरील मूल्यांकनास पाव क.म. त्वरित अनुदान द्यावे, 2012-13 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे, 2003 ते 2010-11 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देणे व त्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतुद करणे तसेच 2011-12 पासुनच्या वाढीव पदांवरील शिक्षकांच्या पदांना मंजुरी द्यावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनिवार्य करुन अनुदानित कारावा व शिक्षकांना अशैक्षणीक कामे देवु नये आदी 32 मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2017 रोजी जळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवुन धरणे आंदोलन करण्यात येईल त्यानंतर नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार त्यानंतर देखील मागण्या मान्य न झाल्यास 2 फेब्रूवारी 2018 रोजी 1 दिवस कॉलेज बंद करुन त्यानंतर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टप्याटप्याने आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष प्रा. अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले.

निवेदन यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ग्रामीण अध्यक्ष प्रा. राजेश भटनागर, सेक्रेटरी प्रा.मनोज देशमुख, प्रा.तुषार चव्हाण, डी.आर.चव्हाण, डॉ.मनोज शितोळे, किरण पाटील, आर.एस.पाटील, ए.पी.पाटील, सुनील पाटील, किशोर चौधरी, एस.पी.निकम, एस.बी.कुमावत, पी.एन.पाटील, एस.आर.पाटील यांच्या सह चाळीसगाव तालुक्यातील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.