प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी कुलगुरुंना निवेदन

0

फैजपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांची भेट घेवून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मागासवर्गीय प्राध्यापकांच्या विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर केले आहे व मागण्या पूर्ण करण्यासाठी साकडे घातले.

या आहेत मागण्या
त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम त्वरीत सुरु करावे, विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नियुक्ती करणे, परिक्षा शुल्कातून व प्रवेश शुल्कात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुट मिळावी, परिक्षांचे वेळापत्रक हे हिवाळी व उन्हाळी सुटी वगळून असावे, पीएचडी प्री व फायनल मुलाखतीचे तातडीने आयोजन करावे, संघटनेसाठी कार्यालय व प्रत्येक महाविद्यालयाची आरक्षण बिंदू नामावली प्रमाणित करण्याची मागणी आहे.

यांनी दिले निवेदन
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. बी.ए. संदानशिव, उपाध्यक्ष डॉ. एल.पी. संदानशिव, सचिव प्रा. डी.आर. तायडे, प्रा. ए.जे. हिवाळे, प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. एस.बी. साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.