शिरपूर । कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढु नये, म्हणून राज्यात गेल्या 29 दिवसापासून लॉकडाऊन आहे. शिरपुरलाही त्याची झळ बसली आहे. सर्व दुकाने, व्यवसाय बंद असल्याने रोजंदारी, हातमजुरी करणार्या लोकांना दैनंदिन चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शिरपूर येथील एस.पी.डी.एम.वरिष्ठ व पा.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधू, भगिनींनी योगदान देऊन निमझरी रस्त्यावरील गरजु रहिवाशांना सुमारे 200 किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्यात खाद्यतेल, दाळ, तांदुळ व इतर जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. साहित्याचे वाटप महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एन. पटेल, संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे, उपप्राचार्य दिनेश पाटील, एम.व्ही.पाटील, ए.एस.मराठे, एस.एस.तिरमले, एस.एन.निकम, व्ही.एम.पाटील, एस.बी.कांबळे, फुला बागुल, आर.के.पाटील, एल.के.प्रताळे, वाय.डी.बेडीस्कर, एस.सी.गोराणे, समीर पाटील, भूषण कुवर, ताराचंद बोरसे, शंकर भिल, यु.पी.पावरा, सुरेश पाटील, नरेंद्र गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले.